निवडणुकीला तुम्हाला कारखान्याची यंत्रणा वापरायची म्हणून तुम्ही एक महिना कारखाना बंद ठेवला- देवदत्त निकम
भीमाशंकर साखर कारखाना सुरु करण्यावरून देवदत्त निकम यांचा विरोधकांवर हल्ला
शिरूर : "निवडणुकीला तुम्हाला कारखान्याची यंत्रणा वापरायची म्हणून तुम्ही एक महिना कारखाना बंद ठेवला हे शेतकरी बांधवांचे मोठ नुकसान आहे". अशा शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी अप्रत्यक्षरित्या सहकारमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या ४२ गावात प्रचार दौरा आज (०२ नोव्हें.) सुरू आहे. या दौऱ्यात निकम यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. निकम यांनी सांगितले आहे की, 'दरवर्षी कारखाने कधी सुरू होतात. दरवर्षी 25 ऑक्टोबरच्या दरम्यान कारखाने चालू होतात. फार लेट झालं तर पाच नोव्हेंबर दरम्यान कारखाने चालू होतात. भीमाशंकर दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटी सुरु होतो. या साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ८००० मॅट्रिक टन इतके आहे. मतदानामुळे हे कारखाने तब्बल एक महिना लेट होतात. यामुळे एका महिन्यात दोन लाख टनाचा उसाचा गाळप होत आहे.कारखाने २० ऑक्टोबरला चालु होतात. कारखाण्याचे कर्मचारी प्रचारासाठी फिरतात. कारखाना आणि बँकेची पगारी यंत्रणा निवडणुकीसाठी वापरली जाते आहे'.
पुढे निकम बोलत होते की, उसाचे लेबर मार्च एप्रिल मध्येच ऊस तोडायला कांन कून करतात . आंबेगाव तालुक्यात ५० एकर जळीत क्षेत्र आहे. पण तो ऊस कधी तोडला जाणार, निवडणुकीसाठी एक महिना तुम्ही कारखाना बंद ठेवला हे शेतकरी बांधवांचे मोठ नुकसान आहे. निवडणुकीला तुम्हाला कारखान्याची यंत्रणा वापरायची म्हणून तुम्ही गाळप परवाने द्यायचं थांबवलं असेल, गेल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवात पहिल्यांदा असे घडत आहे. येत्या पाच सहा दिवसात कारखाना सुरू करावा आणि कामगारांना मतदानाला पाठवावं अशी आमची विनंती आहे.
यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शेखर पाचुंदकर, संभाजी धुमाळ, पंढरीनाथ कांबळे, कैलास धुमाळ, गुलाबराव धुमाळ, कुमार नाणेकर, कुंडलिक जाधव, सचिन पोकळे, संतोष भोगावडे, कुलदीप धुमाळ, उमेश धुमाळ, परशुराम डांगे, पंढरीनाथ तांबे, संपत धुमाळ तसेच रांजणगाव पंचायत समिती गणातील ग्रामस्थ उपस्थित होते.
